चेक वर काय लिहावं Lakh की Lac?

पैशांच्या देवाणघेवाणीसाठी चेक हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे

चेकचा उपयोग आर्थिक व्यवहारांमध्ये केला जातो. पण आता इंटरनेट बँकिंग सारख्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे चेकचा वापर कमी झालाय.

अनेकांची चेक भरत असताना गडबड होते. एका चुकीमुळे आपला चेक रिटर्न येऊ शकतो.

अनेकजण चेकवर रक्कम टाकताना लाखचा उल्लेख इंग्रजीमध्ये (lakh) असा करतात तर काही लोक लाखचा उल्लेख (lac) करतात.

चेकवर लिहित असताना lakh की lac काय लिहाव यामध्ये गोंधळ होतो.

एकाचवेळी दोन्ही शब्दांचा उपयोग करता येणार नाही. जर तुम्हाला बँकेतून एक लाख रुपये काढायचे असतील तर तुम्ही चेकवर इंग्रजीमध्ये 'lakh' असा शब्द लिहू शकता, तिथे Lac चा उल्लेख चालणार नाही.

पण आरबीआयने दिलेल्या गाईडलाईननुसार चेकवर नेहमी 'lakh' असाच उपयोग करावा, lakh हाच शब्द योग्य आहे.

Click Here