छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा पन्हाळागड.
गडावर फिरताना ऐतिहासिक वास्तू, बुरुज, बालेकिल्ला, आणि विविध दरवाजे पाहायला मिळतात.
सज्जा कोठीछत्रपती शिवाजी महाराजांनी येथे काही काळ वास्तव्यास होते. आजही ती वास्तू जतन करून ठेवलेली आहे.
पन्हाळा किल्ल्यावर धान्य साठवण्यासाठी बांधलेले मोठे गोदाम. याचे स्थापत्य पाहण्यासारखे आहे.
अतिशय सुंदर व्ह्यू पॉईंट. तिथून खालच्या दऱ्यांचे आणि जंगलाचे विहंगम दृश्य दिसते. सूर्यास्त पाहण्यासाठी सर्वोत्तम जागा.
गडाच्या बाहेरील भागात असलेली टेकडी. ट्रेकिंगसाठी योग्य, तिथून निसर्गसौंदर्याचा मनोहारी अनुभव घेता येतो.
बाजीप्रभू देशपांडे स्मारकलढाई करून शिवाजी महाराजांना विशाळगडावर सुरक्षित पोहोचवणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांचे स्मारक.
पन्हाळा ते कोल्हापूर अंतर फक्त 21 कि.मी. असून रोड ट्रिपसाठी उत्तम आहे.
गाईड घेणं फायद्याचं ठरतं – त्यांच्याकडून तुम्हाला अनेक ऐतिहासिक गोष्टी समजतात.