ATM'मधून फाटलेली नोट मिळाल्यास काय करायचे?

अनेकदा आपल्याला एटीएममधून पाठलेली नोट मिळते. 

तुमच्या फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शाखेत जा. 

शक्य असल्यास, ज्या बँकेच्या एटीएममधून नोटा काढल्या आहेत तिथे जाणे अधिक सोयीचे ठरू शकते.

तुम्हाला अर्जामध्ये पैसे काढल्याची तारीख, वेळ आणि एटीएमचा पत्ता नमूद करून एक अर्ज बँकेत सादर करावा लागेल. 

एटीएममधून पैसे काढल्याची पावती किंवा तुमच्या मोबाइलवर आलेला मेसेज पुरावा म्हणून दाखवा. 

हे तुमच्या व्यवहाराची पडताळणी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. 

तुम्ही भरलेल्या अर्जासह फाटलेली नोट जमा करा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सर्व बँकांना फाटक्या किंवा खराब झालेल्या नोटा बदलून देण्यास सांगितले आहे. 

जर नोट खूपच जास्त फाटलेली असेल आणि दोन्ही क्रमाक (serial numbers) दिसत नसतील, तर ती रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार हाताळली जाईल. 

Click Here