त्सुनामीमध्ये मोठं नुकसान होतं.
अलिकडेच रशिया, जपान आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये त्सुनामीमुळे प्रचंड विनाश झाला. जर तुम्ही कधी अशा परिस्थितीत अडकलात तर हे उपाय करा.
ताबडतोब सुरक्षित ठिकाणी जा: समुद्रसपाटीपासून किमान ३० मीटर किंवा किनाऱ्यापासून १-२ किमी अंतरावर, उंच जमिनीवर किंवा अंतर्गत ठिकाणी जा.
इशाऱ्यांकडे लक्ष द्या: स्थानिक अधिकारी, रेडिओ, टीव्ही किंवा मोबाईल अलर्टकडून माहिती मिळवा आणि सूचनांचे पालन करा.
किनाऱ्यापासून दूर रहा: समुद्रकिनारे, नद्या किंवा किनारी भागांपासून ताबडतोब दूर जा, कारण त्सुनामीच्या लाटा लवकर येऊ शकतात.
आपत्कालीन किट तयार ठेवा: पाणी, अन्न, औषधे, टॉर्च आणि महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवा.
सर्वांना इशाऱ्याबद्दल सांगा आणि एकत्र सुरक्षित ठिकाणी जा.
नावेत थांबू नका,जर तुम्ही समुद्रात असाल तर खोल पाण्याच्या बाजूला जा किंवा किनाऱ्यावर परत येऊन उंच जमिनीवर जा.
त्सुनामीमध्ये अनेक लाटा येऊ शकतात, म्हणून "सर्व काही ठीक आहे" या अधिकृत सूचनेची वाट पहा.
खराब झालेल्या इमारती किंवा वीज तारांपासून दूर रहा.