वीज बिल प्रमाणापेक्षा जास्त आले तर काय करायचे?

सध्या वीज बिल वापरापेक्षा जास्त येत आहेत, यामुळे अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. 

वीज बिल जास्त आल्यास, सर्वात आधी वापरलेला वीज वापर आणि उपकरणांची यादी तपासा.

त्यानंतर, मीटर रीडिंगची खात्री करा आणि वीज पुरवठादाराच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून किंवा कार्यालयात अर्ज करून तक्रार नोंदवा. किंवा ऑनलाइन अॅपमध्येही तक्रार नोदवता येते.

आवश्यक असल्यास, मीटर तपासणीची विनंती करा आणि बिल पडताळणीसाठी मागील वर्षाच्या बिलाची प्रत सादर करा.

तुमच्या बिलावर किती युनिट्स वापरले आहेत ते तपासा. गेल्या महिन्यांच्या बिलांशी तुलना करा.

घरातील एसी, गीझर, हीटर इत्यादी जास्त वीज वापरणारी उपकरणे तुम्ही जास्त वापरली आहेत का, हे तपासा.

मीटरमध्ये दोष असल्याने रीडिंग जास्त येत असल्यास, मीटर तपासणीची विनंती करा. 

जर मीटर तपासणीत दोष आढळल्यास, बिल दुरुस्त केले जाईल आणि अतिरिक्त रक्कम पुढील बिलात जमा होईल किंवा परत केली जाईल. 

Click Here