अनेक ठिकाणी बिबट्या लोकवस्तीत घुसल्याच्या घटना वाढल्या आहेत.
जर बिबट्या अचानक तुमच्या समोर आला तर नेमकं काय केलं पाहिजे? आणि काय करणं टाळलं पाहिजे?
बिबट्या हा एक अत्यंत लाजाळू प्राणी आहे. त्याला लोकांपासून दूरच रहायला आवडतं. लोकांचा आवाज आला तर बिबटे दूर पळून जातात.
जंगल सफारीवर गेलेल्या लोकांनाही क्वचितच बिबट्याचे दर्शन होत असतं. त्यामुळे बिबटे एकटं राहणंच पसंद करतात.
फक्त विणीच्या काळातच बिबटे समूहात आढळून येतात. मादी बिबट्या किमान एक वर्ष पिल्लांची काळजी घेते.
बिबट्या हा एक अत्यंत वेगवान प्राणी आहे. त्यामुळे बिबट्या मानवी वस्तीत घुसला तर प्रचंड धुमाकूळ घालू शकतो. "गर्दीत घुसलेल्या बिबट्याला पकडणं अजिबात सोपं नसतं.
बिबट्याचं तोंड तुमच्याकडे नसेल तर तो वळून न बघता तसाच सरळ निघून जाऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमच्यावर हल्ला करण्याची त्याला गरज नसते.
मात्र जर अचानक तुमची आणि बिबट्याची समोरासमोर भेट झाली तर हल्ला होण्याची शक्यता जास्त असते.
अशावेळी समोर बिबट्या आल्यास तुमचे दोन्ही हात उंचावून जोरजोरात ओरडलं पाहिजे. असं केल्याने बिबट्याला त्याच्यापेक्षा मोठा प्राणी त्याच्यासमोर आल्याचा भास होऊ शकतो.
बिबट्याचा हल्ला झाला तर कोणत्याही परिस्थितीत पळून जाण्याचा किंवा झाडांमध्ये लपण्याच्या प्रयत्न करू नये.
जर बिबट्या तुमच्यापासून दूर असेल, तर शांतपणे उभे रहा, दोन्ही हात वर करा आणि हळूहळू तिथून मागे हटण्याचा प्रयत्न करा.
जर बिबट्या खूपच जवळ असेल तर दोन्ही हात वर करून, जोरजोरात ओरडत मागे हटण्याचा प्रयत्न केला तरी बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता कमी होत असते.