जिम करताना कोणती काळजी घ्यावी?

दगदगीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणं कठीण झालं आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष देता यावं तरुणाई जिमकडे वळली आहे.

उत्तम आरोग्यासाठी तरुण पिढी जिममध्ये किंवा घरी व्यायाम करतात. परंतु व्यायाम करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अनेकदा दुष्परिणामा होतात. 

सिक्स पॅकच्या नादात आपला जीव गमावू नका. आपणाला आनुवंशिक काही आजार आहे का? याचीही तपासणी केली पाहिजे.

जर एखाद्याच्या आई-वडिलांना यापूर्वी कधी हृदयविकाराचा झटका आलेला असेल तर त्यानं व्यायाम करताना हृदयविकारतज्ञ यांच्याकडे जाऊन कोणत्या प्रकारे व्यायाम केला पाहिजे.

आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी शरीराला व्यायामाची गरज असते. परंतु हा व्यायाम कसा करायचा? कधी करायचा? कुठल्या प्रकारे करायचा? याला काही मर्यादा आहेत.

व्यायाम करताना आपले वय किती? आपणाला कोणते आजार आहेत? आपले शारीरिक रचना कशी आहे? याचा विचार करून व्यायाम करावा.


डॉक्टरांचा सल्ला आणि त्यांचाशी चर्चा करूनच व्यायाम केला तर कोणतेही अनुचित घटना घडणार नाहीत.

Click Here