अनेकांना माहितीय याचा वापर कधी करायचा ते...
मिक्सर ग्राइंडरच्या खाली असलेले हे लाल बटन एक सेफ्टी स्विच आहे, ज्याला ओवरलोड प्रोटेक्टर स्विच म्हणतात.
मिक्सरची मोटर जास्त गरम झाल्यास किंवा त्यावर जास्त दबाव आल्यास तो जळू नये म्हणून हे बटन आपोआप ट्रिप होते आणि मिक्सर बंद पाडते.
हे कधी होते? मिक्सर जास्त वेळेपर्यंत चालवणे. जारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सामग्री भरणे किंवा गरम पदार्थ मिक्सरमध्ये वाटल्यास मोटारवर ताण येतो.
जर तुमचा मिक्सर अचानक बंद पडला, तर तो खराब झाला असे समजू नका. फक्त हे लाल बटन 'रीसेट' केल्यास पुन्हा चालू होतो.
हे करताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. कारण ज्या कारणाने मिक्सर बंद पडला ते कमी करावे लागेल.
जर मिक्सर खूप गरम झाला असेल, तर तो १०-१५ मिनिटे थंड होऊ द्या.
जर जारमध्ये जास्त पदार्थ असेल तर तो कमी करावा. जेणेकरून मोटरवर पुन्हा लोड येणार नाही.