UPSC परीक्षा पास करुन IAS बनण्याचे देशातील लाखो तरुणांचे स्वप्न आहे.
IAS ला किती पगार मिळतो? 7व्या वेतन आयोगानुसार IAS अधिकाऱ्यांची सुरुवातीची बेसिक सॅलरी ₹56,100 प्रतिमाह असते.
पगारासोबत मिळतात भत्ते- महागाई भत्ता (DA), प्रवास भत्ता (TA), घरभाडे भत्ता (HRA) आणि सरकारी निवासदेखील मिळते.
अनुभवासोबत पगार वाढतो - सेवा कालावधी, पदोन्नती आणि वरिष्ठतेनुसार IAS अधिकाऱ्यांचा पगार मोठ्या प्रमाणात वाढतो.
प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते? IAS सेवेमधील सर्वात मोठे आणि प्रतिष्ठित पद म्हणजे कॅबिनेट सचिव.
इतर महत्त्वाची IAS पदे- मुख्य सचिव, विभागीय सचिव आणि जिल्हाधिकारी ही प्रशासनातील महत्त्वाची पदे आहेत.
IAS बनण्यासाठी UPSC CSE परीक्षेचे तीन टप्पे, प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत यशस्वीरीत्या उत्तीर्ण करावी लागते.