जगभरात सगळ्यांत जास्त कोणती भाषा बोलली जाते? अर्थातच ही भाषा आहे इंग्रजी. जगभरात सर्वाधिक लोक इंग्रजी भाषा बोलतात. त्यानंतर क्रमांक लागतो तो चिनी भाषा मँडरिनचा.
जगभरात सुमारे १.५ अब्ज लोक इंग्रजी भाषा बोलतात. तर चिनी मँडरिन भाषा जगात १.२ अब्ज लोकांकडून बोलली जाते.
जगात ६०९ दशलक्ष लोक हिंदी भाषा बोलत असल्याने ती सर्वाधिक बोलणी जाणारी तिसरी भाषा आहे.
जगभरात स्पॅनिश भाषा ५५८ दशलक्ष लोक, अरबी भाषा ३३५ दशलक्ष लोक तर फ्रेंच भाषा ३१२ दशलक्ष लोक बोलतात.
भारताची बंगाली भाषा ही जगातल्या पहिल्या सात भाषांमध्ये आहे जी सर्वाधिक बोलली जाते.
त्यानंतर २६७ दक्षलक्ष लोक पोर्तुगिज, २५३ दशलक्ष लोक रशियन आणि २५२ दशलक्ष लोक इंडोनेशियन भाषा बोलतात.
मराठीचा क्रमांक इथे कुठे आहे का? तर हो. मराठी १६व्या क्रमांकावर असून, ९९ दशलक्ष लोक मराठी बोलतात.