काल विधान सभेत इस्लामपूर या शहराचे नामांतर करण्याची घोषणा केली.
इस्लामपूर हे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालक्यातील एक मोठे शहर आहे.
या शहरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या जास्त आहे. शहराच्या चारही बाजूंनी पीर आहेत.
इस्लामपूर हे गाव उत्तर मध्य युगात आधिलशाही राजवटीच्या काळात नगराची स्थापना झाली.
या गावाचे नाव पूर्वी ईश्वरपूर असल्याचे मानले जाते. यामुळेच इस्लामपूरचे पुन्हा ईश्वरपूर करण्याची मागणी वाढली.
इस्लामपूरमध्ये अनेक मंदिरेही आहेत. माणकेश्वर मंदिरही आहे. उरुण आणि इस्लामपूरच्या सीमेवर असलेले उरणाई देवीचे प्राचीन मंदिर आहे.
परिसरातील सर्व गावांची इस्लामपूर ही एकमेव मोठी बाजारपेठ आहे.
इस्लामपूरमध्ये धार्मिक सलोखा आहे. येथे लोक कोणताही पंथ न पाहता एकमेकांच्या सणांमध्ये उत्साहाने सहभागी होत असतात.