नेपाळमध्ये चर्चेत असलेल्या सुशीला कार्कींचे शिक्षण किती
अंतरिम पंतप्रधानांच्या नावात त्यांचे नाव चर्चेत आहे.
नेपाळमधील अशांततेच्या काळात, माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांना अंतरिम पंतप्रधान बनवण्याची मागणी आहे.
लष्कर आणि Gen- Z निदर्शकांमधील चर्चेनंतर, देशाची सूत्रं ७३ वर्षीय सुशीला कार्की यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुशीला कार्की या नेपाळ सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत. गेल्या काही वर्षांत त्या सरकारविरोधी निदर्शनांचा चेहरा राहिल्या आहेत.
हेच कारण आहे की २०१७ मध्ये नेपाळ सरकारने सुशीला कार्की यांना सरन्यायाधीश पदावरून हटवण्यासाठी संसदेत महाभियोग प्रस्ताव आणला.
यानंतर, सुशीला कार्की नेपाळमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात एक मोठा चेहरा बनल्या. नेपाळच्या Gen- Z मध्येही त्या खूप लोकप्रिय आहेत.
सुशीला कार्कींचा जन्म ७ जून १९५२ रोजी नेपाळमधील बिराटनगर येथे झाला. त्यांचा विवाह नेपाळ काँग्रेस नेते दुर्गा प्रसाद सुबेदी यांच्याशी झाला.
सुशीला कार्की यांनी बीएचयूमधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतरही त्यांनी आपले शिक्षण सोडले नाही आणि १९७८ मध्ये त्यांनी नेपाळच्या त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली.
त्यानंतर त्यांनी १९७९ मध्ये वकिली क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू केली आणि ११ जुलै २०१६ रोजी त्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश झाल्या. त्या ६ जून २०१७ पर्यंत या पदावर राहिल्या.