स्वातंत्र्यदिनानिमित्त आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना मोठी भेट दिली.
पंतप्रधान मोदी यांनी तरुणांसाठी पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजना ही आजपासून सुरू करण्याची घोषणा केली.
ही योजना १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाली असून देशात ३.५ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण करणे आणि तरुणांना कायमस्वरूपी नोकऱ्यांसह आर्थिक मदत देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
या योजनेअंतर्गत, खाजगी क्षेत्रात पहिल्यांदाच नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकारकडून १५,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. याचा लाभ ३.५ कोटींहून अधिक तरुणांना होईल.
जर तुम्ही EPFOमध्ये पहिल्यांदा नोंदणी केल्यानंतर काम करत असाल, तर सरकार तुम्हाला १५००० रुपयांपर्यंतचा आर्थिक फायदा देईल.
ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाईल, पहिला हप्ता सहा महिने काम केल्यानंतर आणि दुसरा हप्ता १३ महिने आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर मिळेल.
जर एखाद्या कंपनीने नवीन लोकांना नोकरी दिली तर तिला प्रति कर्मचारी दरमहा ३,००० रुपयांपर्यंत प्रोत्साहन मिळेल. हा लाभ तिसऱ्या आणि चौथ्या वर्षापर्यंत मिळू शकतो.