काय आहे जपानी वॉकिंग पद्धत?

जपानी वॉकिंग पद्धतीनं वजन कमी करण्यास मदत मिळते.

डॉ. सौरभ सेठी यांनी जपानी वॉकिंग पद्धतीला १० हजार पावलं चालण्यापेक्षा वरचढ म्हटलं आहे. चला तर पाहुया काय आहे ही पद्धत.

जपानी वॉकिंग टेक्नीक ही एक खास पद्धत आहे. ज्यात जोरात आणि हळू चालण्याची पद्धत पुन्हा पुन्हा वापरली जाते.

यात आधी ३ मिनिटं फास्ट चाललं जातं आणि ३ मिनिटं स्लो चाललं जातं. हीच पद्धत आलटून पालटून केली जाते.

फास्ट चालल्यानं शरीराला अधिक मेहनत करावी लागते. ज्यामुळे पायांचे स्नायू मजबूत होतात.

वॉकिंगमधील या बदलानं हृदयाचा व्यायाम होतो. हार्ट बीट नियंत्रित राहतात आणि ब्लड प्रेशरही संतुलित राहतं.

पायी चालण्याच्या या पद्धतीनं स्टॅमिना वाढतो आणि रोजची काम करताना येणारा थकवाही दूर होतो.

फास्ट आणि स्लो वॉकिंगमुळे शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता वाढतो, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हर कंट्रोल राहते.

इंटरव्हल वॉकिंग केल्यानं शरीराला आणखी एक फायदा मिळतो, तो म्हणजे कॅलरी बर्न होण्याचा. ज्यामुळे वजन कमी होतं.

Click Here