सणांमध्ये पूजा-पाठ, आरती किंवा धार्मिक विधींमध्ये कापूर हा घटक नेहमीच असतो.
आरती सुरू होण्याआधी माचिसची काडी लागली की क्षणात पेटणारा आणि सुगंधाने वातावरण भारून टाकणारा कापूर पाहून तुम्हालाही कधी प्रश्न पडला का हा कापूर शेवटी बनतो कशापासून?
बाजारात दोन प्रकारचा कापूर मिळतो नैसर्गिक (Natural) आणि कृत्रिम (Artificial).नैसर्गिक कापूर ‘कॅम्फर’ नावाच्या झाडापासून तयार केला जातो.
या झाडाचं शास्त्रीय नाव आहे Cinnamomum camphora. हे झाड सुमारे 50 ते 60 फूट उंच वाढतं आणि त्याची पाने गोलाकार, सुमारे 4 इंच रुंद असतात.
या झाडाच्या सालेमधून (bark) कापूर तयार केला जातो. साल कोरडी होऊ लागली की तिचा रंग थोडा भुरकट-करडा दिसतो.
ही साल झाडापासून वेगळी करून उकळवली जाते आणि त्यातील घटक पदार्थ रिफाइन केले जातात. त्यानंतर त्याचं पावडरमध्ये रूपांतर केलं जातं आणि मग त्याला कापूरच्या आकारात घडवलं जातं.
कॅम्फरचं झाड कुठे आढळतं?कॅम्फरचं झाड प्रामुख्याने पूर्व आशियात, विशेषतः चीन आणि जपानमध्ये आढळतं.
जपान हे या झाडाचं मूळस्थान मानलं जातं. चीनमध्ये प्राचीन काळापासून लोक औषध पद्धतींमध्ये या झाडाचा वापर केला जातो.
1882-83 च्या सुमारास लखनौ येथील उद्यानात कापूराची यशस्वी शेती करण्यात आली होती. जरी ही यशस्वी शेती काही काळच टिकली, तरी काही वर्षांनी भारतात मोठ्या प्रमाणावर कॅम्फर झाडांची लागवड सुरू झाली.