काय आहे सायलेंट हर्ट अटॅक? पाहा लक्षणे

आजच्या धावपळीच्या जीवनात हृदयरोगांचे प्रमाण सतत वाढत आहे. 

हानिकारक जीवनशैली, ताण आणि चुकीच्या सवयींमुळे हृदयविकारांचे प्रमाण वाढले आहे. 


WHO च्या अहवालानुसार, दरवर्षी सुमारे 1.8 कोटी लोक हृदयविकाराने मृत्यूमुखी पडतात.

Silent Heart Attack, हा असा हृदयविकाराचा झटका असतो, ज्यात वेदना किंवा छातीत तीव्र दुखणे जाणवत नाही,  म्हणूनच त्याला सायलेंट हर्ट अटॅक म्हणतात.

हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल व फॅटचे थर जमणे, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, स्थुलपणा, ताण आणि धूम्रपान, ही याची काही लक्षणे आहेत.

४० वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक, डायबिटीज रुग्ण आणि कमी शारीरिक हालचाल करणाऱ्या लोकांना याचा सर्वाधिक धोका असतो.

छातीत हलका दाब किंवा जळजळ, पाठ/मान/जबड्यात दुखणे, श्वास घेण्यास त्रास, थकवा किंवा झोपेची अडचण, ही याची सुरुवातीची चिन्हे असू शकतात.

ही लक्षणे गॅस किंवा अॅसिडिटीसारखी वाटतात, म्हणून अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. ECG, ब्लड टेस्ट आणि नियमित हृदय तपासणीद्वारे या आजाराचा धोका ओळखता येतो. 

दररोज व्यायाम, हेल्दी डाएट, ताण कमी करणे, धूम्रपान-दारू टाळणे आणि पुरेशी झोप घेणे, हेच यापासून बचावाचे उपाय आहेत.

Click Here

Your Page!