ईव्ही आणि सीएनजी वाहनांबद्दल तुम्ही ऐकलं असेलच, पण हायब्रीड कार म्हणजे नेमके काय?
हायब्रीड कारमध्ये पारंपारिक पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर दोन्ही असतात.
ही कार कधी पेट्रोलवर चालते, तर कधी बॅटरीवर. गरज पडल्यास दोन्हीचा वापर करते.
कमी वेगाने गाडी चालवताना ती इलेक्ट्रिक मोटरवर काम करते, ज्यामुळे इंधनाची मोठी बचत होते.
इलेक्ट्रिक कारप्रमाणे ही बॅटरी चार्ज करण्याची गरज नाही. गाडी चालवताना बॅटरी आपोआप चार्ज होते.
इलेक्ट्रिक मोडमुळे प्रदूषणात लक्षणीय घट होते.
जेव्हा जास्त वेग किंवा शक्तीची गरज असते, तेव्हा पेट्रोल इंजिन काम करते.
यामुळे मायलेज जास्त मिळते, प्रदूषण कमी होते आणि रेंजची चिंता राहत नाही.
हायब्रीड कार म्हणजे पर्यावरणाची काळजी घेण्यासोबतच चांगली कार्यक्षमता मिळवण्याचा एक उत्तम पर्याय!