मनावर आघात करणारा PTSD आजार काय आहे? 

एखाद्या अपघातानंत संबंधित व्यक्तीला PTSD आजार होऊ शकतो.

PTSD म्हणजे अपघातानंतरचा मानसिक ताण. एखादी व्यक्ती अतिशय भीषण किंवा भयावह घटनेतून जाते, तेव्हा त्या घटनेचे मानसिक ओझे मनावर दीर्घकाळ राहाते.

त्या व्यक्तीला वारंवार तीच भयानक घटना आठवत राहते. झोपेत भयानक स्वप्ने पडतात किंवा डोळ्यासमोर तेच दृश्यं पुन्हा जिवंत होते.

वाचलेल्या व्यक्तीला मीच का वाचलो? अशी अपराधी किंवा लाजिरवाणी भावना जाणवते. त्या घटनेशी संबंधित ठिकाण किंवा माणसांपासून व्यक्ती दूर राहण्याचा प्रयत्न करते.

रात्रभर झोप न लागणे, वारंवार घाबरून उठणे, मन एकाग्र न होणे, हे PTSDचे सामान्य लक्षणे आहेत. व्यक्तीला काहीही जाणवत नाही. ना आनंद, ना दु:ख. 

आयुष्याबद्दल नकारात्मक विचार, स्वतःविषयी तुच्छ भावना किंवा भविष्याबद्दल निराशा जाणवू शकते. अनेकदा आत्महत्येचे विचार किंवा स्वतःला इजा करण्याची इच्छा होऊ शकते.

अशा स्थितीत सायकोलॉजिस्ट किंवा सायकेट्रिस्टची मदत घेणे आवश्यक आहे. औषधोपचार आणि कुटुंबीयांचा आधारामुळे PTSD वर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येते.

Click Here