सोनं खरेदी करताना त्याची शुद्धता तपासणं खूप गरजेचं आहे.
सोन्याच्या दागिन्यावर 'BIS' चा त्रिकोणी लोगो आणि हॉलमार्क चिन्ह आहे का ते पहा.
हॉलमार्कवर सोन्याचे कॅरेट (उदा. २२K, १८K) आणि शुद्धता अंक (उदा. ९१६-२२ कॅरेटसाठी, दिलेला असतो.
जून २०२१ पासून हॉलमार्क केलेल्या सोन्यावर ६ अंकी 'HUID' नंबर असणं बंधनकारक आहे.
'BIS Care' ॲप डाउनलोड करून त्यावर तुमच्या दागिन्यावरील HUID नंबर टाकून शुद्धता पडताळून घ्या.
दागिन्यावर ज्वेलर्सचा लोगो/मार्किंग आणि हॉलमार्किंग सेंटरचाही लोगो असतो.
सोनं कधीही चुंबकाला आकर्षित होत नाही. जर ते चिकटले तर सोन्यात भेसळ असण्याची शक्यता आहे.
एक बादली किंवा ग्लासभर पाण्यात सोनं टाका. शुद्ध सोनं लगेच बुडतं, ते तरंगत नाही.
सोन्याला थोडं घासून पहा. जर रंग बदलला नाही तर ते शुद्ध असू शकतं. ही टेस्ट सोनाराकडे करून घेणं अधिक सुरक्षित.