फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स डिजिटली सुरक्षित कसं ठेवायचे?
क्लाउड स्टोरेज म्हणजे इंटरनेटद्वारे डेटा साठवण्याची आधुनिक पद्धत आहे.
या तंत्रज्ञानात माहिती थेट संगणकावर न ठेवता, ती ऑनलाइन सर्व्हरवर ठेवली जाते.
युजर कुठूनही आणि कोणत्याही उपकरणावरून आपला डेटा पाहू किंवा डाउनलोड करू शकतो
Google Drive, iCloud, Dropbox ही काही लोकप्रिय क्लाउड स्टोरेज सेवा आहेत.
यामुळे डेटा बॅकअप सुरक्षित राहतो आणि हार्डडिस्क खराब झाली तरी माहिती हरवत नाही
क्लाउड स्टोरेजमध्ये आवश्यकतेनुसार जागा वाढवता किंवा कमी करता येते.
हे तंत्रज्ञान आज वैयक्तिक वापरापासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वत्र अत्यावश्यक बनले आहे.