प्रवासाला जाण्यापूर्वी तिकीट आहे का नक्की तपासा... अनेकदा कुठे ठेवले ते सापडत नाही, मग....
प्रवासाला निघताना अनेकदा तिकीटच सापडत नाही, असे अनेकदा प्रसंग घडतात.
रेल्वेचे तिकीट असेल किंवा विमानाचे भल्या भल्यांकडून ते हरविते. मग काय करायचे, असाही प्रश्न येतो.
रेल्वे तिकीट हरवल्याचा प्रकार सध्याच्या काळात काऊंटर तिकीटाच्याबाबतच होऊ शकतो.
ऑनलाईन तिकीट असेल तर तुम्ही ते पुन्हा मिळवू शकता. परंतू, काऊंटर तिकीट कसे मिळविणार, असा प्रश्न असतो.
तुमचे रेल्वे तिकीट हरवले तर तुम्हाला डुप्लिकेट तिकीट मिळू शकते. यासाठी कन्फर्म किंवा आरएसी तिकीट असावे लागते.
यासाठी तुम्हाला रेल्वे स्टेशनवर जावे लागते. तिथे अर्ज करावा लागतो. यानंतर डुप्लिकेट तिकीट दिले जाते.
परंतू यासाठी तुम्हाला चार्ज द्यावा लागतो. स्लीपरसाठी ५० रुपये आणि एसीसाठी १०० रुपये प्रति प्रवासी आकारले जातात.