हत्तीचा मृत्यू जवळ येतो, तेव्हा तो काय करतो? वाचून धक्का बसेल

मारुती चितमपल्ली यांनी हत्तींबाबत महत्वपूर्ण महिती दिली आहे. 

चितमपल्ली हे वनविभागाचे निवृत्त अधिकारी होते. त्यांचं काहीच महिन्यापूर्वी निधन झाले. 

त्यांनी आयुष्यातील उमेदीची वर्ष जंगलात काढली. प्राणी-पक्षी यांचे निरीक्षण करून त्यांच्या जगण्याचा भावविश्वाचा अभ्यास केला.

वन्यजीव अभ्यासक म्हणून त्यांची मोठी ख्याती आहे.

हत्तींबाबत ते म्हणतात, ‘हत्ती म्हातारा झाला की हत्तींचा कळप म्हाताऱ्या हत्तीनं त्यांच्यासोबत येऊ नये असं ठरवतो. 

अशा वेळी तो म्हातारा हत्ती नदीच्या काठाजवळ असलेल्या डोहात जलसमाधी तर घेतो किंवा उंचावरून उडी मारून मृत्यू पत्करतो. 

तर काही ठिकाणी नदीला पूर येईपर्यंत तो तिथेच राहतो.

हत्तीचं शव तुम्हाला कधी जंगलात दिसणार नाही आणि चुकून राहिलंच तर सर्व हत्ती मिळून त्या हत्तीच्या मृतदेहाला डोहात नेऊन टाकतात.’

Click Here