मीठ म्हणजे सायलेंट किलर..! रोज हृदयाला थोडे थोडे पोखरते
रोजच्या आहारात मीठ एक महत्त्वाचा घटक, पण त्याचे जास्त सेवन धोकादायक
गेल्या काही वर्षांत भारतात मिठाचे जास्त प्रमाणात सेवन ही एक अदृश महासाथीचे मुख्य कारण, असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिला आहे
आहारात जास्त मीठ खाल्ल्यामुळे लोकांमध्ये उच्च रक्तदाब, लकवा, हृदयविकार आणि मूत्रपिंडाचे आजार वाढत आहे
मिठामध्ये सोडियम घटक असून तो शरीराच्या अनेक कार्यासाठी आवश्यक आहे; परंतु सोडियमचे प्रमाण वाढल्यास शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडते
तज्ज्ञांच्या मते, रोजच्या जेवणात वरून घातलेले मीठच नाही, तर अनेक प्रक्रिया केलेल्या आणि पॅक केलेल्या पदार्थांमध्ये 'हिडन सॉल्ट' असते, ज्याची आपल्याला कल्पनाही नसते
पॅकबंद पदार्थ खरेदी करताना त्यांचे पोषण लेबल तपासा आणि कमी सोडियम (मीठ) असलेलेच पदार्थ निवडा. शक्य असल्यास घरी ताजे अन्न तयार करा
पदार्थांची चव वाढवण्यासाठी मिठाऐवजी लिंबू, आले, लसूण, मिरपूड किंवा विविध हर्ब्स (वनस्पतीजन्य चवी) यांचा वापर करा
मिठाच्या अतिसेवनाने उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, किडनी निकामी होणे आणि हाडांचा ठिसूळपणा यांसारखे गंभीर शारीरिक आजार होण्याची शक्यता असते