'चलनातील नोटा' कशापासून बनवल्या जातात?

अनेकांना प्रश्न असेल की, या नोटा कोणत्या कागदापासून बनवल्या जातात.

भारत हळु-हळू डिजिटायझेशनकडे वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत लोक क्वचितच रोख चलनाचा वापर करत आहेत. परंतु अनेक ठिकाणी रोख रकमेचीच गरज असते. या चलनाच्या नोटेचे फार महत्व आहे.

अनेकांना प्रश्न असेल की, या नोटा कोणत्या कागदापासून बनवल्या जातात, तर यासाठी कागदाचा वापर होत नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण यात कागद नाही तर दुसऱ्याच वस्तुचा वापर केला जातो.

वेगवेगळ्या देशांमध्ये चलनी नोटा वेगवेगळ्या साहित्यापासून बनवल्या जातात, तर भारतीय नोटा कशापासून बनवल्या जातात ते जाणून घेऊया.

भारतीय चलनी नोटा कागदापासून बनवल्या जात नाहीत, तर एका खास कापडासारख्या मिश्रणापासून बनवल्या जातात.

भारतीय चलन कापूस आणि तागापासून बनवले जाते.

म्हणजेच, भारतीय नोटा १००% कापूस आणि तागाच्या मिश्रणापासून बनवल्या जातात, ज्यामुळे त्या टिकाऊ राहतात, सहज फाटत नाहीत आणि पाण्याने किंवा घामाने सहजपणे खराब होत नाहीत.

यामध्ये वॉटरमार्क, सुरक्षा धागा, इंटॅग्लिओ प्रिंटिंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, यामुळे बनावट नोटा बनवणे कठीण होते.

१०, २०, ५०, १००, २००, ५०० यासारख्या नोटांमध्ये वापरले जाणारे कापड आणि शाई भारत सरकारच्या विशेष सुरक्षा पेपर मिलमध्ये तयार केली जाते.

Click Here