WhatsApp चॅट लपवायचे आहे? मग ही ट्रिक लक्षात ठेवा

WhatsApp अनेकांच्या रोजच्या जीवनातील महत्वाचे अ‍ॅप आहे.

सर्वांनाच विनाकारण व्हॉट्सअॅप आवडत नाही, या इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्ये अनेक जबरदस्त फिचर आहेत. हे वापरकर्त्यांना आवडतात.

व्हॉट्सअपवर चॅट लपवण्यासाठी मस्त फिचर आहे. याचा अनेकांना फायदा होणार आहे.

तुम्हाला लपवायचे असलेले चॅट न उघडता त्यावर लाँग प्रेस करा.

लाँग प्रेसनंतर, तीन डॉटवर क्लिक करा, तुम्हाला लॉक चॅट पर्याय दिसेल.

चॅट लॉक केल्यानंतर, तुम्हाला चॅट लिस्टच्या वरच्या बाजूला लॉक्ड चॅट नावाचा एक फोल्डर दिसेल. जर तुम्हाला हे फोल्डर लिस्टमधून गायब करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता.

फोल्डर लपवण्यासाठी, आधी तुम्हाला लॉक केलेले चॅट फोल्डर उघडावे लागेल, फोल्डर उघडल्यानंतर, उजव्या बाजूला असलेल्या तीन ठिपक्यांवर टॅप करा आणि सेटिंग्जमधील लपवा पर्यायावर क्लिक करा.

'हाईड' पर्यायावर क्लिक करताच, फोल्डर चॅट लिस्टमधून गायब होईल,  'हाईड' अंतर्गत असलेला गुप्त कोड वापरा आणि या फोल्डरसाठी एक गुप्त कोड तयार करा कारण तुम्ही या कोडच्या मदतीनेच फोल्डर शोधू शकाल.

Click Here