त्यांचे प्रेरणादायी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
विकास दिव्यकीर्ती युपीएससी परिक्षेची तयारी करुन घेतात.
विकास दिव्यकीर्ती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नेहमी चर्चेत असतात.
अनेकदा त्यांचे प्रेरक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशाच एका व्हिडिओमध्ये त्यांनी प्रत्येकाने वाचावे अशा ५ पुस्तकांची नावे सांगितली आहेत.
गोदान गोदान ही मुन्शी प्रेमचंद यांची एक यशस्वी कादंबरी आहे. ही कादंबरी ब्रिटीश वसाहतवादी राजवटीतील ग्रामीण भारताची एक जिवंत आणि हृदयस्पर्शी कहाणी सांगते.
माय एक्सपेरिमेंट्स विद ट्रूथ हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र आहे. हे त्यांनी गुजराती भाषेत लिहिले आहे. हे पुस्तक त्यांच्या बालपणापासून ते तारुण्यापर्यंतच्या घटनांचे वर्णन करते.
सेपियंस हे पुस्तक इस्रायली लेखक युवाल नोआ हरारी यांनी लिहिले आहे. यामध्ये मानवजातीचा इतिहास आणि त्याच्या उत्पत्तीपासून ते मानवी रूपात रूपांतरित होण्यापर्यंतचा त्याचा दीर्घ प्रवास वर्णन केला आहे.
द हिस्ट्री ऑफ मैनकाइंड हे पुस्तक जर्मन भूगोलशास्त्रज्ञ फ्रेडरिक रॅटझेल यांनी लिहिले आहे. यामध्ये मानवाच्या उत्क्रांतीचे तपशीलवार वर्णन केले आहे.
सोफीज वर्ल्ड हे प्रसिद्ध नॉर्वेजियन लेखक जोस्टीन गार्डर यांनी लिहिले आहे. यामध्ये फिलॉसफी अतिशय सोप्या आणि मनोरंजक भाषेत स्पष्ट केले आहे.