युरीन इन्फेक्शन झालंय? घ्या ही काळजी

अनेक महिलांना वारंवार युरीन इन्फेक्शन होण्याची समस्या असते. 

अनेक महिलांना वारंवार युरीन इन्फेक्शन होण्याची समस्या असते. या इन्फेक्शनमुळे बराच त्रास स्त्रियांना सहन करावा लागतो.

अनेकदा आपल्या नकळतपणे आपल्याच चुकीच्या सवयींमुळे आपल्याला युरीन इन्फेक्शनसारख्या समस्येला सामोरं जावं लागतं. म्हणूनच, हे इन्फेक्शन झाल्यावर कोणती काळजी घ्यायची ते पाहुयात.

युरीन इन्फेक्शन झाल्यानंतर अनेकदा युरीन पास करतांना वेदना होणे, रक्त येणे, ताप येणे यांसारख्या समस्या होतात. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेले अँटीबायोटिक्स घेणं गरजेचं आहे.

भरपूर प्रमाणात पाणी प्या. यामुळे लघवीचं प्रमाण वाढून बॅक्टेरिया शरीराबाहेर टाकले जातील.

दैनंदिन स्वच्छता राखणं गरजेचं आहे. तसंच शक्य असेल तर शक्यतो सार्वजनिक शौचालयांचा वापर करणं टाळा.

युरीन इन्फेक्शन झाल्यास लिंबूपाणी, क्रॅनबेरी ज्यूस यांचं सेवन करा.

लघवी जास्त वेळ रोखून ठेऊ नका.

आरोग्याचे ‘पांढरे शत्रू’, आजचं आहारातून करा आऊट!

Click Here