निगेटिव्ह विचारांमुळे झोप येत नाही? 'हे' ५ उपाय करा, शांत झोप लागेल

झोप आपल्या शरीरासाठी महत्वाची आणि गरजेची असते.

झोपेच्या कमतरतेमुळे सकाळी उठायला होत नाही, झोप अपूर्ण राहिल्यामुळे थकवादेखील जाणवू लागतो.

बदलती जीवनशैली आणि रात्रीच्या अवाजवी विचारांमुळे सध्या अनेकांना निद्रानाशाचा त्रास होतोय.

झोपेच्या या कमतरतेमुळे सकाळी उठायला होत नाही, झोप अपूर्ण राहिल्यामुळे थकवादेखील जाणवू लागतो.

रात्री विचार सतावतात आणि झोप लागत नाही? मग 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा, शांत झोप लागेल.

जास्त विचार आरोग्यासाठी घातक आहेत. त्यामुळे झोपेची एक वेळ ठरवा आणि दररोज न चुकता त्याच वेळी झोपण्याची सवय लावा.

मोबाईल आणि टीव्हीचा अतिवापर तुमची झोप हिरावू शकतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी स्क्रीनपासून दूर राहा.

स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांवर आणि मेंदूवर परिणाम करतो; ज्यामुळे झोप लागणे कठीण होऊन जाते.

चहा आणि कॉफी पिणे टाळा – चहा किंवा कॉफी पिणे तुमच्या झोपेत व्यत्यय आणू शकते, त्यामुळे दीर्घकाळापर्यंत झोप येत नाही. त्यातील कॅफिन तुमच्या झोपेच्या चक्रावर परिणाम करू शकते. 

शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी १०-१५ मिनिटे योगा किंवा ध्यान करा. यामुळे ताण कमी होऊन मन शांत होते.

Click Here