UPSC ची तयारी करताना या टिप्स फॉलो करा

UPSC नागरी सेवा परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. 

UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी फक्त अभ्यास पुरेसा नाही. मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि संयम राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. 


नागरी सेवा परीक्षा असो किंवा सरकारी नोकरीची तयारी असो, ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन  खूप महत्वाचे आहे. 

मॉक टेस्टपूर्वी थोडे अस्वस्थ वाटणे सामान्य आहे. जेव्हा तुम्हाला सतत चिंता, निद्रानाश, चिडचिड, डोकेदुखी आणि थकवा जाणवत असेल तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका.


संपूर्ण दिवस लहान भागांमध्ये विभागा. सकाळी वाचन करा, तर दुपारी उत्तर लेखनाचा सराव करा. 

जलद चालणे, धावणे किंवा योगा यासारख्या किमान ३० मिनिटे शारीरिक हालचाली करा. दिवसभरात ७-८ तास झोपही तितकीच महत्वाची आहे. 

संर्व विषयांचा अभ्यास एकदाच करण्याऐवजी विषयांची विभागणी करा. प्लॅनर किंवा स्टडी ट्रॅकर ठेवा. याने तुम्हाला आत्मविश्वास मिळेल.

UPSC चा प्रवास एकाकीपणा आणि चिंता वाढवू शकतो. कुटुंब, मित्र, मार्गदर्शक किंवा इतर उमेदवारांशी सतत चर्चा करत राहा. 

दररोज १० मिनिटे ध्यान केल्यानेही मन शांत होण्यास खूप मदत होते. याशिवाय, पौष्टिक अन्न खा, ज्यामध्ये फळे, भाज्या आणि प्रथिने असतात. भरपूर पाणी प्या.

लेखनाचा सराव केल्याने चिंता कमी होण्यास मदत होते. वेळेच्या दबावाखाली उत्तरे आणि निबंध लिहिण्याचा सराव केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो.

Click Here