ब्लू आधार कार्ड कसं काढायचं?

ब्लू आधार कार्डसाठी तुम्हाला केंद्रात जावे लागणार नाही

देशातील सुमारे ९० टक्के लोकसंख्येकडे आधार कार्ड आहे. पण आधार कार्ड लहान मुलांसाठी देखील बनवतात हे तुम्हाला माहितीये का? 

मुलांच्या आधार कार्डला ब्लू आधार कार्ड असे म्हणतात. त्यांचे आधार कार्ड त्यांच्या पालकांच्या आधार कार्डशी जोडलेले असते.

ब्लू आधार कार्ड बनवण्यासाठी  तुम्हाला कष्ट करावे लागणार नाहीत. हे आधार कार्ड बनवण्यासाठी UIDAI अधिकारी तुमच्या घरी येतील.

या प्रक्रियेसाठी, तुम्हाला आधी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. होम पेजवर Service request पर्याय दिसेल.

तुम्हाला चाइल्ड आधार एनरोलमेंटचा पर्याय निवडावा लागेल. चाइल्ड आधार एनरोलमेंटचा पर्याय निवडताच, खालील स्क्रीनवर एक फॉर्म उघडेल.

फॉर्ममध्ये आवश्यक असलेली माहिती भरा जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसचा पत्ता.

फॉर्म सबमिट केल्यानंतर १० दिवसांनी, पोस्ट ऑफिसमधील काही लोक तुमच्या घरी तुमच्या मुलासाठी आधार कार्ड बनवण्यासाठी येतील.

Click Here