तुमच्या घरातील Wi-fi स्लो असेल, तर या ट्रिक्स नक्की वापरा.
राउटर घराच्या मध्यभागी, उंचावर आणि खुल्या जागेत ठेवा. भिंती, मेटल वस्तू, फ्रिज, मायक्रोवेव्ह यांच्यापासून दूर ठेवा.
2.4GHz पेक्षा 5GHz खूप वेगवान असतो. गेमिंग, स्ट्रीमिंग, व्हिडिओ कॉलसाठी 5GHz बेस्ट. राउटरच्या सेटिंगमध्ये जाऊन बँड बदलता येतो.
खूप डिव्हाइसेस एकाच Wi-Fi ला जोडली तर स्पीड कमी होतो. जे डिव्हाइस वापरत नाही ते Wi-Fi वरून हटवा.
आठवड्यातून एकदा राउटर रीस्टार्ट किंवा अपडेट केल्याने नेटवर्क फ्रेश होते.
3-4 वर्षांपूर्वीचा जुना राउटर असेल तर बदलण्याचा विचार करा.
घर मोठे असेल तर सिग्नल दूरपर्यंत पोहोचत नाही. अशावेळी Wi-Fi एक्स्टेंडर / रिपीटर वापरल्याने कव्हरेज वाढते.