गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, त्यामुळे या दिवशी पारंपरिक लूकला विशेष महत्त्व असते.
नऊवारी किंवा साडीवर खालच्या बाजूला बांधलेला अंबाडा सर्वात उठून दिसतो.
जर तुम्हाला आधुनिक आणि पारंपरिक असा 'फ्युजन' लूक हवा असेल, तर मेसी बन हा एक उत्तम पर्याय आहे. यात केसांच्या काही बटा चेहऱ्यावर सोडल्यास लूक अधिक आकर्षक दिसतो.
लांब केस असलेल्या मुलींसाठी सागर वेणी किंवा खजुरी वेणी अतिशय सुंदर दिसते. या वेणीमध्ये छोटी फुले किंवा सोन्याची आभूषणे माळली तर तो लूक शाही वाटतो.
ज्यांना केस पूर्ण बांधायला आवडत नाहीत, त्यांनी पुढच्या बाजूने दोन लहान वेण्या घालून पाठीवर केस मोकळे सोडावेत. याला हाफ-अप हाफ-डाऊन स्टाईल म्हणतात.
पारंपरिक अंबाड्याला थोडा आधुनिक टच देण्यासाठी तो एका बाजूला (कानजवळ) बांधा. हा लूक सिल्कच्या साड्यांवर अतिशय 'ग्रेसफुल' दिसतो.
तुमचे केस मध्यम लांबीचे असतील तर केसांना खालच्या बाजूने हलके कर्ल्स करा आणि एका बाजूला गुलाबाचे फूल किंवा एखादी छोटी फुलांची माळ लावा.