आजकाल लोक सुरक्षित आणि चांगला परतावा देणारे गुंतवणुकीचे पर्याय शोधत आहेत. शेअर बाजारात जोखीम तर बँकांमध्ये व्याजदर कमी.
अशा वेळी, सरकारने मान्यता दिलेल्या पोस्ट ऑफिस बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात!
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) : ज्येष्ठ नागरिक बचत योजना ७.४% पर्यंत व्याज देते. (कलम ८०C अंतर्गत करसवलत)
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) : या योजनेत ५ वर्षांसाठी ७.७% पर्यंत व्याज, १००% सुरक्षित. (८०C अंतर्गत करसवलत)
मुलींच्या भविष्यासाठी सर्वात चांगला पर्याय! सुकन्या समृद्धी योजना ८.२% सर्वाधिक व्याज देते. (करमुक्त उत्पन्न)
बँक FD पेक्षा जास्त परतावा हवाय? पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये ५ वर्षांसाठी ७.५% व्याज मिळवा.
या योजनांमध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. बाजारातील चढउतारांचा यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही.
तुम्ही अगदी कमी रकमेपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि हळूहळू एक मोठा निधी तयार करू शकता.
म्हणून, जोखीम न घेता पैशाची सुरक्षित वाढ करायची असेल, तर पोस्ट ऑफिसच्या या योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत!