शेअर बाजारात नवखे आहात? १० मूलभूत नियम

शेअर बाजारात नव्याने गुंतवणूक करण्यासाठी हे १० मूलभूत नियम माहिती असणे आवश्यक आहे.

कोणत्याही कंपनीत पैसे गुंतवण्यापूर्वी तिचा व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि भविष्यातील योजनांचा अभ्यास करा.

आर्थिक उद्दिष्टाशिवाय गुंतवणूक म्हणजे दिशाहीन जहाज आहे.

तुमची धोका पत्करण्याची क्षमता किती आहे, त्यानुसार गुंतवणुकीचे पर्याय निवडा.

एकाच कंपनीत किंवा क्षेत्रात सगळे पैसे न गुंतवता वेगवेगळ्या ठिकाणी विभागून गुंतवणूक करा.

शेअर बाजार दीर्घकाळात चांगला परतावा देतो, त्यामुळे अल्पकालीन चढ-उतारांनी घाबरू नका.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून नियमितपणे थोडी थोडी गुंतवणूक करा.

भीती आणि लालच यांपासून दूर राहा आणि तर्कशुद्ध विचार करून निर्णय घ्या.

तुमच्या गुंतवणुकीची वेळोवेळी तपासणी करुन गरजेनुसार बदल करा.

शेअर बाजाराबद्दल नवीन माहिती मिळवत राहा आणि आपले ज्ञान अद्ययावत ठेवा.

गरज वाटल्यास आर्थिक सल्लागाराची मदत घ्यायला संकोच करू नका.

Click Here