डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळणार का?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायल आणि पाकिस्तानकडून नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्याने चर्चेत आहेत.
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल ट्रम्प यांचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवण्यात आलंय.
ट्रम्प यांना २०१८, २०२० आणि २०२१ मध्ये नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.
जगात युद्ध समस्या उद्भवल्यास तिथे शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
नोबेल पुरस्काराची सुरुवात १९०१ मध्ये स्विडीश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांनी केली होती. दरवर्षी १० डिसेंबरला हा पुरस्कार दिला जातो.
आता हा पुरस्कार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिळेल का? याकडे सगळ्यांची नजर आहे.