बाईकवर लावल्या जाणाऱ्या ५ रंगाच्या ध्वजाचा अर्थ काय?
यावर लिहिलेल्या शब्दांचा अर्थ काय, जाणून घ्या...
कधी लेह-लडाख, हिमाचल, सिक्कीमसारख्या या प्रदेशात फिरण्यासाठी गेला असला तर तुम्हाला ५ रंगाचे बौद्ध प्रार्थना ध्वज लटकलेले दिसून येतात.
निळा, पिवळा, लाल, पांढरा आणि हिरवा अशा रंगाच्या या प्रत्येक ध्वजावर काही शब्द लिहलेले असतात.
हे ध्वज पाच घटकांचे आणि पाच दिशांचे प्रतीक मानले जातात. त्यांचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप खोल आहे.
तर या ध्वजांचे पाच रंग हे पाच तत्त्वांचे प्रतीक आहेत. यामध्ये पहिला रंग निळा आहे, जो आकाश तत्व आणि पुर्व दिशेचे प्रतीक मानला जातो.
पांढरा रंग म्हणजे वायू आणि पश्चिम दिशा. लाल रंग हा अग्नि हे तत्व आणि दक्षिण दिशेचे प्रतीक आहे.
तर हिरवा रंग पाण्याशी आणि उत्तर दिशेशी संबंधित आहे. पिवळा रंग हा पृथ्वी आणि तिच्या केंद्राचे प्रतीक मानला जातो.
तिबेटी भाषेत या ध्वजांवर "ॐ मणि पद्मे हुम्" लिहिलेले आहे. ओम हा सर्वात पवित्र शब्द आहे, त्यानंतर येतो मणि म्हणजे रत्न, पद्मे म्हणजे कमळ आणि हम म्हणजे ज्ञानाने भरलेला आत्मा.
तिबेटी लोक या ध्वजांना खूप पवित्र मानतात. ही ध्वज केवळ सौंदर्य किंवा स्टाईलसाठी नसून, वाऱ्याद्वारे सकारात्मक ऊर्जा आणि प्रार्थना चारही दिशांना पोहोचावी या हेतूनं लावले जातात.