पृथ्वी पूर्णपणे गोल नाही, संत्र्यासारखी थोडी चपटी आहे. या आकारामुळे भूमध्य रेषेवर पृथ्वीचं अंतर केंद्रापासून सर्वाधिक असतं आणि त्यामुळे तिथं गुरुत्वाकर्षण इतर भागांच्या तुलनेत किंचित कमी जाणवतं.
पृथ्वीवर काही ठिकाणं भौगोलिक स्थितीमुळे जगभर प्रसिद्ध झाली आहेत. त्यापैकी एक ठिकाण जिथे चंद्र सर्वात जवळ आहे.
इक्वाडोर, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेला एक छोटा देश.
‘इक्वाडोर’ या शब्दाचा स्पॅनिश भाषेत अर्थच ‘भूमध्य रेषा’ असा आहे. जगात १३ देश पूर्णपणे भूमध्य रेषेवर आहेत. इक्वाडोर हा देशही असाच आहे.
इक्वाडोरची राजधानी क्विटो समुद्रसपाटीपासून २,८५० मीटर उंचीवर आहे. क्विटोला जगातील दुसरी सर्वात उंच राजधानी मानले जाते.
इक्वाडोरमधील माउंट चिम्बोराझो हा एवढा उंच नसला तरी तो पृथ्वीच्या केंद्रापासून एव्हरेस्टपेक्षा अधिक उंच आहे. तो भूमध्य रेषेजवळ आहे.
चंद्र पृथ्वीला सर्वात जवळ दिसण्याचं स्थान हिमालयात नसून इक्वाडोरमध्ये आहे.