पाण्यात राहूनही पाणी पित नाही 'हा' प्राणी!

तुम्हाला माहितीये का, एक असा प्राणी आहे, जो पाण्यात राहूनही पाणी पित नाही. 

पाण्यात राहूनही पाणी न पिणारा हा प्राणी बेडूक आहे. तो तोंडाने पाणी पित नाही, तर त्वचेने शोषून घेतो. 

या प्रक्रियेला ऑसमॉसिस म्हणतात. याद्वारेच बेडूक पाणी पितो. 

बेडूक नद्या, तलाव आणि ओलसर जंगलात राहतात. त्यांची त्वचा ओलसर ठेवण्यासाठी पाणी आवश्यक असते. 

बेडकांनाही पाण्याची गरज असते, परंतु ते तोंडाऐवजी त्वचेतून ओलावा शोषून घेतात. यामुळे ते इतर प्राण्यांपेक्षा वेगळे ठरतात.

भारतीय संस्कृतीत, बेडकाला पावसाचे प्रतीक मानले जाते. कारण बेडूक आर्द्र वातावरणात सक्रिय असतात.

बेडकाची त्वचा केवळ पाणी शोषत नाही तर ऑक्सिजन देखील शोषून घेते. हा उभयचर प्राणी जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी जगू शकतो.

काही बेडूक विषारी असतात आणि त्यांच्या त्वचेचा रंग बदलू शकतो. हे लहान प्राणी भक्षकांपासून वाचण्यासाठी वेगाने उडी मारू शकतात.

बेडूक कीटक खाऊन पर्यावरण संतुलन राखतात. त्यांची उपस्थिती निरोगी पाण्याच्या स्रोतांचे संकेत देते.

पाण्यात राहणारा पण तोंडातून पाणी न पिणारा बेडूक हा निसर्गाचा चमत्कार आहे.

Click Here