अनोळखी लोकांपासून काही गोष्टी लपवून ठेवणंच फायद्याचं असतं.
जीवनात अशा काही गोष्टी असतात, ज्या कधीही कुणाला सांगू नये. कारण याने तुमचंच नुकसान होऊ शकतं.
आपल्या काही कमजोरी असू शकतात. पण त्या चुकूनही कधी कुणाला सांगू नये. कारण त्यांच्या वापर करून आपला गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
आपल्या आर्थिक स्थितीची, व्यवहारांची माहिती सुद्धा बाहेरच्या कुणाशी शेअर करू नये. अपवाद घरातील लोक.
घरातील वादाच्या गोष्टी किंवा खाजगी गोष्टी बाहेर कुणाला सांगू नये. याने घरात आणखी कलह निर्माण होऊ शकतो.
भविष्यातील प्रत्येक योजना सगळ्यांसोबत शेअर केल्या तर फोकस हलतो आणि ऊर्जाही कमी होते.
आपले मानसिक संघर्ष किंवा टेंशन केवळ जवळच्या लोकांसोबतच शेअर केले पाहिजे. अनोळखी लोकांकडे नाही.