इंटरनेटशिवाय आज कोणाचंच पान हलत नाही, पण लोक करतात काय?
पूर्वी म्हणजे माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या या प्रश्नाचं उत्तर साधं सोप्पं होतं; अन्न वस्त्र निवारा! पण आता तसं राहिलेलं नाही.
बदलत्या काळानुसार जगणं बदललं. तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली की, मोबाईल आणि इंटरनेटशिवाय आज कोणाचंच पान हलत नाही.
खेड्यात शेतीकाम करणाऱ्या माणसापासून तर शहरातल्या अगदी लहान मुलापर्यंत प्रत्येक जण इंटरनेट वापरतो.
पण एका दिवसात म्हणजे फक्त २४ तासांत इंटरनेटवर काय काय होतं हे तुम्हाला माहीत आहे? दिवसभरात तब्बल ३३३ अब्ज ई-मेल्स पाठवल्या जातात.
२४ अब्ज वेळा टेक्स्ट पाठवले जातात, तर ८.५ अब्ज वेळा गुगलवर सर्च केलं जातं! आणखी काय काय होतं इंटरनेटवर दिवसभरात?
एका दिवसात इंटरनेटवर तब्बल ५०० दशलक्ष ट्विट केले जातात. ३३३ अब्ज ईमेल्स पाठवले जातात.
त्याचबरोबर २.५ अब्ज पोस्ट फेसबुकवर टाकल्या जातात. स्नॅपचॅटवर ३.५ अब्ज स्नॅप्स, २४ अब्ज टेक्स्ट मेसेजस, ८.५ अब्ज गुगल सर्चचा वापर होतो.
१.६ अब्ज टिंडर स्वाइप्स केलं जातं. १५१ दशलक्ष तास झूम मीटिंग होतात. त्याचबरोबर १.४ अब्ज तास इंटरनेटवरून स्ट्रिमिंग म्हणजे लाईव्ह प्रसारण केलं जातं.