सापांना आमंत्रण देतात ही झाडं...!

तुमच्या घराजवळ तर नाहीत ना...?

पावसाळा ऋतू हा अत्यंत आल्हाददायक मानला जातो. मात्र हाच ऋतू सापांनाही आमंत्रण देतो. पावसाळ्यात काही झाडेही तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात.

ही झाडे घरी लावणे, म्हणजे सापांना आमंत्रण दिल्यासारखे मानले जाऊ शकते. तर जाणून घेऊयात या झाडांसंदर्भात...

सापांच्या दृष्टीने बांबूचे झाड हे लपण्यासाठी चांगले ठिकाण असते. यामुळे बांबूच्या झाडांभोवती सापांचा धोका असू शकतो.

पिंपळाची रुंद पाने ही सापांसाठी अतिशय योग्य ठिकाण आहे, साप पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पिंपळाच्या झाडांचा आश्रय घेऊ शकतात.

पावसाळ्यात कडुलिंबाचे झाड धोकादायक ठरू शकते. कारण सापांसारखे धोकादायक प्राणी कडुलिंबाच्या झाडाजवळ उष्णता अनुभवतात. यामुळे आपल्याला कडुलिंबाच्या झाडाजवळ साप दिसू शकतात.

अर्जुनचे झाड दाट असल्याने, ते सापांचे घर बनू शकते. साप लपण्यासाठी हे ठिकाण योग्य समजतात.

केळीचे झाड ओलावा आणि सावली देते, म्हणूनच सापांना हे झाड आवडते. महत्वाचे म्हणजे, काही कीटकही या झाडाजवळ येतात, जे सापांना आवडतात.

कच्ची केळी खाण्याचे 6 आश्चर्यकारक फायदे...! जाणून घ्या...

Click Here