दुधी भोपळ्यामध्ये कॅलरीजंच प्रमाण कमी असतं, त्यात शरीराल आवश्यक पोषक तत्वे आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
दुधी भोपळा वजन कमी करण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते. पण दुधी भोपळ्याचे अनेक तोटेही आहेत.
काहींना आरोग्याच्या काही समस्यांमध्ये दुधी भोपळा खाणे हानिकारक ठरु शकतो.
गर्भवती महिलांसाठी तसेच रक्तदाब आणि मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्यांसाठी दुधी भोपळा खाणे हानिकारक असू शकतो.
गर्भवती महिलांना भोपळा खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्यात काही विषारी पदार्थ असतात जे बाळाच्या विकासावर परिणाम करू शकतात.
दुधी नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करण्यास मदत करते. म्हणून, उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी ते फायदेशीर असले तरी, कमी रक्तदाब असलेल्यांसाठी ते धोकादायक ठरू शकतो.
दुधी भोपळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे सामान्य लोकांसाठी फायदेशीर असते, परंतु ते मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते.
दुधी भोपळा पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहे कारण त्यात पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. पण, ज्यांना गॅस, पोटफुगी किंवा अपचनाचा त्रास आहे त्यांनी त्याला खाणे टाळावे.
दुधीचा रस पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, परंतु जर दुधी कडू असेल तर हानिकारक ठरु शकते. कडू दुधीच्या रसामुळे उलट्या, अतिसार, तीव्र पोटदुखी आणि गंभीर विषबाधा होऊ शकते.