हे आहेत जगातील सर्वात विषारी ५ साप...! 

काही क्षणांत होऊ शकतो माणसाचा मृत्यू...!

जगात अनेक विषारी जीव आढळतात. मात्र, सर्वात धोकादायक जीवाचा विचार करायचा झाल्यास, पहिले नाव येते सापाचे. तर जाणून घेऊयात, जगातील सर्वात घातक सापांसंदर्भात...

ब्लॅक मांबा - जगातील सर्वात धोकादायक सापांमध्ये हा साप पहिल्या क्रमांकावर येतो. हा विशेषतः आफ्रिकेत आढळतो. याच्या विषाचे केवळ २ थेंबच माणसाचा जेगेवरच जीव घेऊ शकतात.

फोर-डी-लान्स - हा एक असा साप आहे, जो एखाद्या माणसाला चावल्यानंतर, त्याचे विष शरीरात शिरताच ती व्यक्ती काळी पडते. हे साप सादारणपणे दक्षिण आणि मध्य अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आढळतात.

बूमस्लँग - द. आफ्रिकेत आढळणारा हा हिरव्या रंगाचा साप एवढा घातक आहे की, त्याच्या चाव्याने २४ तासांत संबंधित व्यक्तीच्या डोळ्यांतून, फुफ्फुसातून, हृदयातून आणि मूत्रपिंडातून रक्तस्त्राव सुरू होतो.

ईस्टर्न टायगर स्नेक - हा साप आग्नेय ऑस्ट्रेलियाच्या पर्वतांमध्ये आढळतो. त्याच्या शरीरावर पिवळे आणि काळे पट्टे आढळतात. हा चावल्यानंतर साधारणपणे १५ मिनिटातच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

रसेल व्हायपरहा साप एवढा धोकादायक आहे की, त्याच्या चाव्याने संबंधित व्यक्तीचे मूत्रपिंड निकामी होते आणि रक्तस्त्राव होतो. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो.

Click Here