व्हिटामिन बी१२ ची कमतरता असेल, तर 'हे' पेय तुम्ही घेऊ शकता
सतत थकवा जाणवणं, शरीरात ऊर्जा नसल्यासारखं वाटणं, हे तुमच्या शरीरात व्हिटामिन बी१२ कमी असल्याचे लक्षण आहे. त्यासाठी काही पेय तुम्ही घेऊ शकता.
व्हिटामिन बी१२ हे लाल रक्तपेशी बनवण्यासाठी आणि मेंदूचं कार्य चांगलं राहण्यासाठी असते. शरीरातील व्हिटामिन बी१२ चे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी काही पेय घ्यायला हवी.
पहिलं म्हणजे तुम्ही दूध घेऊ शकता. एक ग्लास दूध हे व्हिटामिन बी१२ मिळवण्याचा सोपा मार्ग आहे. दररोज एक ग्लास दूध तुम्हाला व्हिटामिन बी१२ वाढवण्यास मदत करू शकते.
बटरमिल्कही अर्थात ताक बी१२ साठी चांगला पर्याय आहे. ताकामधूनही तुमची व्हिटामिन बी१२ ची उणीव भरून निघू शकते.
आणखी एक पेय म्हणजे लस्सी. बी१२ शोषून घेण्यास आणि पचन वाढवण्यासाठी लस्सी हे उन्हाळ्यात चांगले पेय आहे.