'या' देशाच्या राष्ट्रध्वजावर आहे हिंदू मंदिर!

या जगात एक असा देश आहे, ज्याच्या राष्ट्रध्वजावर हिंदू मंदिर आहे. 

जगात सर्वाधिक हिंदू लोकसंख्या भारतात आहे. भारतात हिंदूंची संख्या तब्बल १०० कोटींहून अधिक आहे.

नेपाळ हा सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेला दुसरा मोठा देश आहे.

पण, या जगात एक असा देश आहे, ज्याच्या राष्ट्रध्वजावर हिंदू मंदिर आहे. 

राष्ट्रध्वजावर मंदिर असणारा हा देश कोणता आहे? आणि यामागचे कारण काय आहे? चला जाणून घेऊया... 

कंबोडिया हा जगातील एकमेव असा देश आहे, ज्याच्या राष्ट्रीय ध्वजावर हिंदू मंदिर आहे.

कंबोडियाच्या ध्वजावर हिंदू संस्कृतीचे प्रतीक असलेल्या अंगकोर वाट मंदिराचे चित्र आहे.

अंगकोर वाट हे जगातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी आहे. १२व्या शतकात याची बांधणी झाली होती.

हे मंदिर कंबोडियाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

या देशाच्या ध्वजावर तीन पट्टे आहेत, यात खाली आणि वर निळे, तर मध्ये लाल पट्टा आहे. याच पट्ट्यावर मंदिर आहे.

या ध्वजाचा निळा रंग राजेशाहीचे प्रतीक आहे, लाल रंग राष्ट्र आणि त्याच्या लोकांचे प्रतिनिधित्व करतो, तर पांढरा रंग धर्म आणि अंगकोर वाट मंदिराचे धार्मिक महत्त्व दर्शवतो. 

Click Here