पोषक तत्वांनी समृद्ध असलेले ड्रॅगन फ्रूट खाण्यास जेवढे चविष्ट, तेवढेच शरीरासाठी हानिकारकही ठरू शकते. याच्या अधिक सेवनाने शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तर जाणून घेऊयात...
अॅलर्जी -काही लोकांना ड्रॅगन फ्रूटची अॅलर्जी असू शकते, यामुळे हे खाल्ल्याने त्यांच्या त्वचेवर पुरळ उठणे, सूज येणे आदी समस्या उद्भवू शकतात.
अधिक ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढते, यामुळे वजनही वाढते. यामुळे लठ्ठपणाही येऊ शकतो.
अधिक प्रमाणात ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने लोकांमध्ये पचनाची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच, त्यात असलेल्या फायबरचे प्रमाण शरीरात गॅस, सूज आणि पोटदुखी आदी समस्या निर्माण करते.
खरे तर ड्रॅगन फ्रूटमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. यामुळे मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो. यामुळे आपण हे फळ खाणे टाळायला हवे.
ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. त्यात असलेले घटक मल मऊ बनवतात. मात्र अधिक सेवनाने अतिसारही होऊ शकतो.
ड्रॅगन फ्रूटमध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते, यामुळे मूत्रपिंडाच्या समस्या वाढू शकतात. यामुळे मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो.
अधिक प्रमाणात ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने शरीराला इतरही अनेक समस्यांना सामेरे जावे लागू शकते...