जिभेचा रंग आणि त्यात झालेले बदल, आपली आरोग्य स्थिती दर्शवतात
अंतर्गत शारीरिक समस्यांचा परिणाम शरीराच्या बाह्यांगांवरही स्पष्टपणे दिसत असतो.
जिभेचा रंग आणि त्यात झालेले बदल, आपली आरोग्य स्थिती दर्शवतात.
जिभेवर पांढरे थर जमा होणे, हे पचनाशी संबंधित समस्या आणि कफ वाढण्याचे संकेत आहे.
जिभेचा पिवळेपणा हा कावीळ आणि शरीरात रक्ताची कमतरता दर्शवतो.
जीभ निळसर होणे, हृदयरोग आणि फुफ्फुसाची समस्या दर्शवते.
जिभेवर भेगा पडणे हे शरीरात इंफेक्शनचे लक्षण असू शकते.
मूत्रपिंड आणि मधुमेहाच्या समस्येतही जिभेवर भेगा येऊ शकतात.
जिभेवर व्रण (छाले) येणे हे व्हिटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे होऊ शकते.
ओरल थ्रश (फंगल इंफेक्शन) देखील जिभेवर व्रण आणि थर येण्याचे कारण ठरू शकते.