दमदार पावसाने वेरूळ लेणी परिसर पुन्हा एकदा निसर्गसौंदर्याने बहरला आहे.
खुलताबाद शहर परिसर, वेरूळ, म्हैसमाळ येथे पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील धबधबा पुन्हा एकदा वाहता झाला आहे.
श्रावण महिना सुरु होताच छत्रपती संभाजीनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
मुसळधार पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळ येथील २९ क्रमांकाच्या लेणीजवळील धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.
म्हैसमाळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे म्हैसमाळ येथून उगम पावणारी येळगंगा नदी खळखळून वाहू लागली आहे.
या येळगंगा नदीचा प्रवाह वेरूळ येथील लेणी क्रमांक २९ जवळ कोसळत धबधब्यात बदलतो. सध्या धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळताना दिसत आहे.