युवकांसोबतच लहान मुलांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढलं
हृदयविकाराच्या झटक्याने तरुणच नव्हे तर लहान मुलांतही प्रमाण वाढत चालत असल्याचं अलीकडच्या काळात निदर्शनास आले
ही बाब वैद्यकीय नाही तर सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवरही विचार करण्यास भाग पाडणारी ठरत आहे असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात
फुफ्फुसातील रक्तवाहिनीतील दाब कमी होऊन रक्ताचा प्रवाह डावीकडील रक्तवाहिनीत जातो. यामुळे रक्त वाहणारे महत्त्वाचे पौष्टिक घटक हृदयाला कमी पडतात
अवरोधित वाहिनीमुळे एखाद्या प्रौढाला हृदयविकाराचा झटका येताना होते तसेच बाळाला हृदयविकाराची भयानक वेदना होते अन् अटॅक येतो
सध्याची निष्क्रिय जीवनशैली, जंक फुडचा अति वापर, मानसिक तणाव आणि वंशानुगत कारणांमुळे लहान वयात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढलं आहे
मैदानावरील वेळ मोबाईलवर घालवित असल्याने मुलांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे
पिझ्झा, बर्गर, पॅकेट स्नॅक्स, सॉफ्ट ड्रिंक्स यामुळे शरीरात वाईट कोलेस्टेरॉल साचतोय, त्यामुळे लहान वयातच रक्तवाहिन्या बंद होत असल्याचं तपासात समोर