तुम्ही टीव्हीचे थेट बटण बंद करता का?... STOP

सॉफ्टवेअरपासून ते डिस्प्लेपर्यंत, होऊ शकते मोठे नुकसान

तुम्ही तुमचा स्मार्ट टीव्ही रिमोटऐवजी थेट मेन पॉवर स्विचमधून बंद करत असाल, तर तुम्ही मोठी चूक करत आहात. 

यामुळे केवळ टीव्हीचे सॉफ्टवेअरच नाही, तर त्याचे मदरबोर्ड आणि डिस्प्लेसारख्या महत्त्वाच्या भागांचेही गंभीर नुकसान होऊ शकते.

जुने टीव्ही हार्डवेअर-आधारित असल्यामुळे त्यांना अशा प्रकारे बंद करणे ठीक होते.

पण आजचे स्मार्ट टीव्ही मोबाईल फोनप्रमाणे सॉफ्टवेअरवर चालतात. त्यामुळे त्यांना योग्य पद्धतीने बंद करणे आवश्यक आहे. 

थेट पॉवर स्विचमधून बंद केल्यास टीव्हीचे ऑपरेटिंग सिस्टम अचानक बंद होते, ज्यामुळे सॉफ्टवेअरमधील डेटा करप्ट होण्याची शक्यता असते.

शॉर्ट सर्किटचा धोका: टीव्ही थेट मेन पॉवरमधून बंद केल्यास सुरू असलेल्या प्रक्रियांमध्ये अचानक व्यत्यय येतो, ज्यामुळे मदरबोर्डमध्ये शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. 

मदरबोर्ड बदलण्याचा खर्च टीव्हीच्या एकूण किमतीच्या ६०-७०% असू शकतो.

यामुळे स्क्रीनवर हिरव्या किंवा गुलाबी रंगाच्या रेषा येऊ शकतात किंवा ब्राइटनेसमध्ये असमानता निर्माण होऊ शकते.

त्यामुळे, तुमचा स्मार्ट टीव्ही बंद करताना नेहमी प्रथम रिमोटच्या पॉवर बटणाने त्याला शटडाउन करा आणि त्यानंतरच मेन पॉवर स्विच बंद करा. 

टीव्हीच्या रिमोटवर टीव्ही बंद करण्याचे बटण असते ते एकदा दाबले की टीव्ही बंद होत नाही तर तो स्लीप मोडमध्ये जातो. बंद करण्यासाठी ते बटण काही सेकंद दाबून ठेवावे लागते.